गोव्यात होणार नवे क्रूझ टर्मिनल; ड्युटी फ्री शॉप, लाउंज, फूड कोर्ट सारख्या मिळणार सुविधा! . पणजी : गोव्याच्या मुरगाव बंदर प्राधिकरणाने (MPA) मार्च 2025 पर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी टर्मिनल बांधण्याची घोषणा केलीय. 2023-2024 या वर्षात क्रूझ प्रवाशांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. MPA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल्स आणि संबंधित सुविधांच्या विकासामुळे पर्यटन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

कोरोनामुळे 2020 पासून गोव्याच्या पर्यटनावर खूप वाईट परिणाम दिसून आला, परंतु गेल्या 4 वर्षांपासून मंदीशी झुंजत असलेल्या गोव्याच्या पर्यटन उद्योगात देशी-विदेशी पाहुण्यांचा ओघ आता झपाट्याने वाढला आहे. हे पाहता हे क्रूझ टर्मिनल बांधण्यावर भर देण्यात आला असून ते पुढील वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.12 आणि 13 सप्टेंबर रोजी गोव्यात सागरी राज्य विकास परिषदेची बैठकी पार पडली. ‘जागतिक क्रूझ जहाज वाहतुकीतील तेजीमुळे मुरगाव बंदरात क्रूझ जहाजांची आवक झपाट्याने वाढली आहे आणि भविष्यात त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.बैठकीत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी प्रस्तावित अत्याधुनिक इमारतीला भेट दिली. या इमारतीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल असतील’, अशी माहिती एमपीएच्या अधिकाऱ्याने बैठकीत दिली.’नव्या सुविधेत प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाईल. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये 24 इमिग्रेशन काउंटर, 10 चेक-इन काउंटर, एक वेटिंग लाउंज आणि इतर सुविधा असतील. टर्मिनलमध्ये ड्युटी फ्री रिटेल शॉप, लाउंज, फूड कोर्ट आणि इतर सुविधाही असतील’, असेही अधिकाऱ्याने सांगितले.Exciting developments for Goa’s cruise tourism. A state-of-the-art International & Domestic Cruise Terminal at Mormugao Port will be ready by March 2025, boosting passenger traffic and enhancing the local economy. Goa is set to shine in the global cruise market!#TheGoaModel pic.twitter.com/rW5V0jPp2p— TheGoaModel (@The_GoaModel) September 17, 2024गोव्यात चार दिवसांत सात जणांचा अपघाती मृत्यू; वाहतूक मंत्र्यांनी Engineer’s वर फोडले खापरगोवा नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण राहिला आहे. येथील पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे संकटाचा सामना करावा लागला. या काळात पर्यटकांच्या संख्येतही 90 टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली.यानंतर गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने कोविड-19 महामारीवर मात करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय चार्टर’, ‘पर्यटन व्यापार’ मदत अशा अनेक योजना सुरू केल्या.सन 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये येथे येणा-या क्रूझ जहाजांच्या संख्येत 15 टक्के आणि क्रूझ प्रवाशांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी सुमारे 20 टक्के पर्यटकांची पहिली पसंती गोवा असते. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी-नोव्हेंबर 2023 दरम्यान 4.03 लाख परदेशी पर्यटक गोव्यात आले. त्याच वेळी, गोवा सरकारच्या पर्यटन विभागानुसार, 2019 मध्ये सुमारे 71 लाख देशी पर्यटक आणि सुमारे 10 लाख विदेशी पर्यटक गोव्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button