गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाचे तब्बल ३ लाखांचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना.
गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाचे तब्बल ३ लाखांचे दागिने चोरल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बसस्थानकात दागिने चोरीचे सत्र थांबलेले दिसून येत नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला पतीसह रविवारी चिपळूण ते रत्नागिरी असा प्रवास करणार होती. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात खेड-रत्नागिरी ही एसटी बस आली असता त्यामध्ये ही महिला चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत त्या महिलेच्या खांद्याला असलेली पर्सची चेन उघडून त्यामध्ये ठेवलेले छोटे पाकिट चोरून नेले. त्यामध्ये तब्बल तीन लाख ३ हजार २५० रुपये किंमतीचे १२ तोळे, ५ ग्रॅम किंमतीचे तोडे, कर्णफुले, हार असा ऐवज होता. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com