
75 वर्ष कोकणावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी स्वायत्त कोकण समितीची स्थापना ! प्रक्रिया प्रारंभ 19 सप्टेंबर
कोकणातील पहिले शेतकऱ्यांचे बागायतदारांचे मच्छीमारांचे पर्यटन व्यवसायिकांचे युवकांचे भव्य स्वराज्य भूमी कोकण आंदोलन !75 वर्षे कोकणावर अन्याय सुरू आहे आणि म्हणून स्वायत्त कोकण ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे. यासाठी त्या त्या विषयातील तज्ञांची आणि उद्योजकांची स्वायत्त कोकण समिती स्थापन करणार – समृद्ध कोकण संघटनातीस हजार कोटी ची कर्जमाफी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा नव्हे तीनदा मिळाले पण कोकणातील मच्छीमार आणि अंबा बागायतदारांना एकदा सुद्धा कर्जमाफी मिळाली नाही. ती मिळाली पाहिजे. प्रामुख्याने माकड आणि अन्य मान्य प्राणी यामुळे कोकणातील शेती जवळपास बंद व्हायला आली, माकडांवर नियंत्रण आणण्यासाठी मोठे अभियान कितीही पैसे लागले तरी तातडीने राबवले पाहिजे.कोकणातील 90% नोकऱ्या कोकणाबाहेर तरुणांना हे बंद झाले पाहिजे.शिक्षक तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक आरोग्य सेवक क्लास थ्री आणि क्लास फोर 80% नोकऱ्या कोकणातील तरुणांना कोकणात मिळाल्या पाहिजेत. पुन्हा प्रादेशिक निवड मंडळ सुरू झाली पाहिजेत.सोयाबीन धान कापूस हमीभाव मिळतो ऊसाला एफ आर पी, सरकारी खरेदी होते त्याप्रमाणे काजू बीला आणि सुपारीला हमीभाव मिळाला पाहिजे.मुंबई कोकण सतरा वर्ष बांधकाम सुरू असलेला, कोकणाची प्रगती 25 वर्ष मागे नेणारा महामार्ग पुढच्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे, यापुढे कोकणात सिमेंटचे रस्ते नकोत, दर्जेदार डांबराचे रस्ते भ्रष्टाचार न करता आम्हाला द्या.स्वायत्त कोकण समिती आणि स्वायत्त कोकण अभियान कशासाठी संकल्पनाराज्याला सर्वाधिक उत्पन्न कोकण प्रदेश देत असेल तर विकासासाठी सर्वाधिक निधी कोकणाला मिळाला पाहिजे. कोकण विकासाचे विषय उर्वरित महाराष्ट्र पेक्षा वेगळे आहेत त्याचे स्वतंत्र नियोजन झाले पाहिजे आणि विकासाचे निकष कोकणासाठी वेगळे असले पाहिजेत.कोकणाचा विकासाचा निधी दरवर्षी 31 मार्चला अन्य विभागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला वळवला जातो त्याप्रमाणे अन्य कुठल्याही विभागाला यापुढे देता कामा नये ! या निधीचा उपयोग 100% कोकणातील तरुणांना रोजगार निर्माण होण्यासाठी, आणि प्रामुख्याने उद्योगांच्या पायाभूत सोयी विकसित होण्यासाठी झाला पाहिजे. कोकण प्रदेश महाराष्ट्र ला 40 टक्के उत्पन्न देत असेल तर त्या प्रमाणात विकास निधी कोकणाला मिळाला हवा. हा निधी कसा वापरायचा हे आयएएस अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि पुढाऱ्यांनी ठरवण्यापेक्षा हा निधी वापरण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ञांचे मदत आणि सहभाग घ्यायला हवा आणि त्यासाठी तज्ञांची समिती स्वायत्त कोकण समिती स्थापन करत आहोत. कॉन्ट्रॅक्टर चे कल्याण करणारे विकासाचे धोरण यापुढे कोकणात बंद झाले पाहिजे.कोकणच्या विकासाचे प्रश्न वेगळे आहेत त्याप्रमाणे विकासाचे नियोजन व्हायला पाहिजे , कोकणात उद्योग करण्यासाठी स्थानिक तरुणांना सहजपणे परवानगी मिळायला पाहिजेत आणि सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. आंबा काजू बोर्ड शून्य निधी, महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन शून्य निधी, कोकणातील पर्यटन विकास शून्य निधी रोजगार देणारे हे तीन विषय याकरता दरवर्षी प्रत्येक विषयासाठी एक हजार कोटी प्रमाणे 3000 कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या बजेटमध्ये व्हायला हवी. आणि यातून दरवर्षी हजारो कोकणातील स्थानिक उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी मदत व्हायला हवी. पर्यटन बांधकामे, सीआरझेड, हाऊस बोट ,वायनरी उद्योग, वाळू उद्योग, जांभा दगड खाणी, वॉटर स्पोर्ट्स ,साहसी पर्यटन सगळे निसर्ग आधारित आणि निसर्ग पूरक उद्योग कोकणात अनधिकृत पणे करावे लागतात, सरकारी अधिकारी कोणत्याही परवानगी देत नाही आणि सतत नोटीस देतात यापुढे एक महिन्यात उद्योगांना परवानगी मिळायला पाहिजेत, सरकारी अधिकाऱ्यांची हफ्तेबाजी यापुढे कोकणात चालणार नाही. 2023 पर्यंतची पर्यटनाची सर्व बांधकामे याला नाममात्र दंड भरून अधिकृत परवानगी मिळायला हव्यात, उल्हासनगर मधील अनधिकृत बिल्डिंग आणि मुंबईतील सरकारी जमिनीवरच्या सीआरझेड मधल्या परप्रांतीयांच्या झोपड्यांना संरक्षण मिळते तसे संरक्षण मिळाले पाहिजे. स्वतंत्र कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी,19 सप्टेंबरपहिली स्वायत्त कोकण परिषद आणिपहिले शेतकरी मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांच्या आंदोलन आमरण उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रत्नागिरी .19 सप्टेंबर सकाळी १० आंदोलन रॅली सुरुवात हॉटेल अलंकार, हातखंबा सकाळी ११-२. पहिली स्वायत्त कोकण परिषद. हापूस आंबा, काजू फलोद्यान शेती पर्यटन इको टुरिझम, मच्छीमार, माशांची शेती मत्स्य उद्योग प्रक्रिया उद्योग मसाला शेती बांबू लागवड हाऊस बोट साहसी पर्यटन इत्यादी पर्यटनातील प्रमुख क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आणि तज्ञ मंडळींचा सहभाग यांच्या उपस्थितीत स्वायत्त कोकण समितीची स्थापना दुपारी दोन वाजल्यापासून पुढे पदयात्रा मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि त्यानंतरजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरुवात. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आणि प्रत्यक्ष जीआर निघेपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील.आंदोलनात आणि अभियानात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मhttps://docs.google.com/forms/d/1Eg8ZITfFbyzXzjgT8cT_g4J0VUz6vbj97FyzxSd3pwQ/editसंजय यादवरावअध्यक्ष समृद्ध कोकण संघटनाप्रदीप ( बाबा )साळवी समृद्ध कोकण शेतकरी संघटना संचालक युयुतसू आराते ओम प्रकाश कोळथरकरविकास शेट्ये उपाध्यक्षसंदीप शिवधनकर सरचिटणीस मंदार जोशी सरचिटणीस कोकण चेंबर ऑफ कॉमर्सअनिश निमकर सरचिटणीसहरीश खेडेकर कोकण पर्यटन क्लब संचालक साईनाथ गावकर कोकण क्लब सिंधुदुर्ग जिल्हा संचालक सुनील आकरेकरकोकण मच्छीमार क्लब संचालक सुमंत कुलकर्णी कोकण मत्स्य शेती क्लब संचालक मायकल डिसोजा कोकण बांबू क्लब संचालक नंदादीप पालशेतकर कोकण मसाला शेती लोकसंचालक आशिष बर्वे कोकण फळ प्रक्रिया क्लब संचालक यासोबत 100 कोकणातील प्रत्यक्ष काम करणाऱ्या तज्ञांची समिती. दीपक उपळेकर, राजू भाटलेकर, सुहास ठाकूरदेसाई,विनय मुकादम, उल्हास पिंपुटकर, प्रमोद केळकर रत्नागिरीमंदार सप्रे विनय सरफरे सुरेंद्र कारेकर, रवींद्र सकपाळ.मुकादम ( राजापूर ) नंदू चोगले, महाडिक, उदय जोशी , मंगेश मोरे ( दापोली ) सतीश कदम, साबीर सिराज कौचाली ( खेड ) इफ्तिकार चरफरे श्रीवर्धन, प्रशांत धामणसे कोलाड प्रकाश कदम पोलादपूर पुढील आठ दिवसात संपूर्ण स्वायत्त कोकण समिती जाहीर करण्यात.