शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार… सुधीर (भाऊ) साळवी’, , लालबागच्या राजाला साकडे.

दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लालबागचा राजा मंगळवारी सकाळी विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. यापूर्वी मंडपातील कार्यकर्ते आणि अन्य भक्तांनी डोळे भरुन राजाचे दर्शन घेतले.लालबागचा राजाचा मंडपात विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरु असताना कोणीतरी गणपतीच्या पायावर एक चिठ्ठी आणून ठेवली. ही चिठ्ठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या चिठ्ठीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार, याची चर्चा सुरु झाली आहे.लालबागचा राजाच्या पायाशी ठेवलेल्या या चिठ्ठीमुळे आगामी काळात लालबाग परिसरातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाऊ शकतो. लालबागचा परिसर हा शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो. ठाकरे गटाचे अजय चौधरी हे सध्या शिवडीचे आमदार आहेत. मात्र, लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवलेल्या चिठ्ठीत सुधीर साळवी साळवी समर्थकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे समजते. ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार… सुधीर (भाऊ) साळवी’, असा मजकूर या चिठ्ठीत लिहण्यात आला आहे.आज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायमआज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी ही चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखणाऱ्या आमदारांमध्ये अजित चौधरी यांचा समावेश होता. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्यामुळे लालबाग परिसरात सुधीर साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनीलालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे पाहावे लागेल. सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागच्या राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button