मेंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते देवगड असा प्रवास करत असताना रेल्वेच्या दारातून तोल जावून पडल्याने तरूणाचा मृत्यू.

मेंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते देवगड असा प्रवास करत असताना देवगड येथील ३० वर्षीय तरूणाचा रेल्वेच्या दारातून तोल जावून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्माराम शरद सावंत (३०, रा. मुणगे, सावंतवाडी, ता. देवगड, जि. रत्नागिरी) व त्याचा मित्र ओमकार प्रकाश घाडी (२३, शिवशंभो चाळ नं. ०१, शिवटेकडी मजासवाडी जोगेश्‍वरी पूर्व मुंबई) हे दोघे मुंबई येथून देवगड येथे गणपती उत्सवाकरिता जात होते. रत्नागिरी येथे रेल्वे आली असता आत्माराम हा रेल्वेच्या दरवाजाच्या पायरीजवळ जावून बसला. त्याचा तोल जावून तो दारातून खाली पडल्याने गंभीर दुखापत झाली. जिल्हा रूग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button