
पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस व सेलेरो कारचा भीषण अपघात, काच फोडून 48 एनसीसी विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस व सेलेरो कारचा भीषण अपघात झाला आहे.एस टी बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहनी झाली नाही.मात्र काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवारी) हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी बस कर्जत खोपोलीमार्गे माणगावकडे जात होती. तर सेलेरो कार पाली बाजूकडून खोपोलीकडे जात होती. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस विद्यार्थ्यांसहीत पलटी झाली. मागील काच फोडून 48 एनसीसी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात सेलेरो कारमधील डॉ. आयुष गायकवाड आणि विशाल पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तात्काळ पाली पोलीस व स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू आहे या आपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे.