पत्नीसोबत झालेल्या वादातून पुण्यातील तरूणाची वरंधा घाटात आत्महत्या.

पत्नीसोबत झालेल्या वादातून पुणे येथील तरूणान रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटात आत्महत्या करत आयुष्याची अखेर केली. श्रीकांत विलास देशमुख (रा. धनकवडी-पुणे) असे मृत तरूणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नीला एसएमएसही पाठवला होता. स्थानिक पोलीस व रेस्क्यू पथकाने रविवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह वरंधा घाटातून शोधून काढत नातेवाईकांच्या ताब्यात दिला.श्रीकांत देशमुख हे धनकवडी येथे पत्नी व दोन मुलींसोबत रहात होते. १५ सप्टेंबर रोजी पत्नीसोबत त्यांचे भांडण झाले. रागाच्या भरात स्वतःची कार घेवून थेट रायगड जिल्ह्यातील वरंधा घाट गाठले. तिथे पत्नीला लोकेशन पाठवत आत्महत्या करत असल्याचा एसएमएस पाठवला. हा एसएमएस पाहुन त्यांच्या पत्नीच्या पायाखालची वाळूच सरकली. तातडीने भोर पोलिसांना कळवत पोलिसांसमवेत घटनास्थळ गाठले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button