
विहिरीत पडलेला मोर वनविभागाच्या ताब्यात
रत्नागिरी ः दापोली तालुक्यातील गवे येथील मंगेश गावडे यांच्या विहिरीत मोर पडल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी वनविभागाला त्याची माहिती दिल्यावर वनखात्याचे पथक व ग्रामस्थांनी या मोराला विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले. पायाला मार लागल्याने मोर किरकोळ जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.