
किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवेस सोमवार पासून सुरुवात.
नव्या पर्यटन हंगामात येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवेस सोमवार पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.जिल्ह्याच्या किनारपट्टी परिसरात २५ मे ला पर्यटन हंगामाची सांगता झाली होती. गेले तीन महिने बंद असलेले किनारपट्टी भागातील पर्यटन आता सुरू होत असून पर्यटन व्यवसायिकही सज्ज झाले आहेत. १ सप्टेंबर पासून पर्यटन हंगामास सुरवात होते. मात्र समुद्रातील वाऱ्याचा वेग व पाऊस यामुळे यावेळी उशिराने हंगामाची सुरुवात झाली.