
आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी, याबाबत नियम करणार.
मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेची दखल घेत आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी, याबाबत नियम करण्याबरोबरच शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे.पुढील 15 दिवसांत राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार असून, यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.