रायगड पोलिसांचे कौतुकास्पद कामगिरी, चाकरमान्यांच्या शंभर वाहनांची दुरुस्ती किंवा त्यांची स्टेपनी बदलण्याचे काम
मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी अहाेरात्र पहारा दिला. वेळप्रसंगी त्यांनी बंद पडलेल्या वाहनांचीही दुरुस्ती केली.या काळात शंभर वाहनांची दुरुस्ती किंवा त्यांची स्टेपनी बदलण्याचे काम पोलिसांनी केले.गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा प्रवास विनाअडथळा निर्विघ्न होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला होता. त्यासाठी चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली.१५ दिवसांपासून तत्पर पेण ते महाडदरम्यानच्या रस्त्यात होणाऱ्या पंक्चर गाड्यांना तत्काळ स्टेपनी बदलण्यासाठी स्वत: पोलिस कर्मचारी वाहनचालकाला मदत करीत होते. तर काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधन-सामग्रीच्या सहाय्याने बंद पडलेल्या चारचाकी, तीनचाकीसह दुचाकीचे काम केले. मागील १५ दिवसांपासून रायगड पोलिसांनी चांगली सुविधा दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.