रत्नागिरीतील ईद-ए-मिलाद नबी मोठ्या उत्साहात.
रत्नागिरी शहरामध्ये आज ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी धनजीनाका ते मारुती मंदिर मार्गे थिबा पॅलेस मार्गावरती एक रॅली काढण्यात आली. तसेच कोकणनगर ते मारुतीमंदिर मार्गे उद्यमनगर होऊन पुन्हा कोकणनगर येथे दावते इस्लामी यांची एक ईद-ए-मिलादची रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे वयोवृद्ध, जाणकार लोक तसेच लहान मुलं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये चार चाकी गाडी, टेम्पो, दुचाकी घेऊन लोक सहभागी झालेले दिसत होते.या दोन्ही रॅलीचे मारुती मंदिर येथे श्री रत्नागिरीचा राजा आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्यावतीने पुष्पगुच्छ व पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने दोन्ही धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते