गुन्हेगारी संचित रजेवरुन फरार आरोपीवर गुन्हा दाखल.
कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर गेलल्या आरोपी परत कारागृहात दाखल झाला नाही. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाईक मुस्ताक करंबळेकर (रा. ए-विंग, प्राईड प्लाझा, शिवाजीनगर, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ सप्टेंबरला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, जि. कोल्हापूर) येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी फाईक यास १४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याला २८ दिवसांच्या संचित रजेवर मुक्त करण्यात आले होते. रजा उपभोगून त्याने स्वतः कारागृहात दाखल होणे अपेक्षीत होते. पण आरोपी अद्यापही कारागृहात दाखल झाला नाही. तो १२ सप्टेंबर पासून अनधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य करत आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.