२४ लाख फसवणूक प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन.
खेड शहरातील एका तरूणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी जेरबंद केलेल्या त्या २ भामट्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १८ सप्टेंबरर्पंयत पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूक प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यादृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपास गतीमान केला आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही पडताळा करण्यात येत आहे.www.konkantoday.com