मंगला एक्स्प्रेसने दिल्ली ते कुन्नूर (केरळ) असा प्रवास करत असताना केरळ येथील ७१ वर्षीय एका व्यक्तीचामृत्यू.
मंगला एक्स्प्रेसने दिल्ली ते कुन्नूर (केरळ) असा प्रवास करत असताना केरळ येथील ७१ वर्षीय एका व्यक्तीच्या छातीत कळ आल्याने त्याला उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच ही व्यक्ती मृत झाल्याची घटना शुक्रवारी लांजा येथे घडली. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून लांजा पोलिसात नोंद झाली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पवित्रण रामण पण्णी (७१, रा. पुरकल्लम, केरळ) व त्यांचा मुलगा शरद पवित्र पण्णी (२९, पूरक्कलम, केरळ) हे दोघे दिल्ली येथून आपल्या केरळ येथील पुरक्कलम, कुन्नूर येथे मंगला एक्स्प्रेसने निघाले होते. मंगला एक्स्प्रेस तालुक्यातील आडवली येथे ११.३० च्या दरम्यान क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी पवित्रण यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा शरद पण्णीने पवित्रण यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता पण्णी यांना उपचाराआधीच मृत घोषित केले.