झिरो व्हॅल्यू झालेल्या उपरकर यांनी यापुढे भाजपा नेत्यांवर टीका करू नये -आमदार नितेश राणे

ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे आणि ज्याला कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारत तयार नाही असे माजी आमदार परशुराम उपरकर जेव्हा मंत्री रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यांवर बेछूट खोटे आरोप करतात त्यावर सिंधुदुर्गातील जनता नक्कीच विचार करेल. मात्र भारतीय जनता पार्टी म्हणून असे आरोप आम्ही खपवून घेणार नाही.स्वतःचे हिशोब चुकते करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेचे घाणेरडे राजकारण करत असतील तर त्यांचाही हिशेब आमच्या कडे आहे.तो काढायला लावू नका अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल केला.स्वतःचे हिशोब चुकते करण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी उपरकर हे शिवछत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेचा वापर करत असल्याची टीकाही आमदार नितेश राणे यांनी केली. मंत्री रवींद्र चव्हाण,अनिकेत पटवर्धन यांनी सिंधुदुर्ग च्या विकासासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. रवींद्र चव्हाण यांचे कौतुक करता येत नसेल तर किमान घाणेरडे राजकारण करू नये. असे हे आरोप भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. जिल्हा विकासात एक टक्का योगदान नसलेल्या उपरकर यांनी यापुढे मंत्री रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन व त्यांच्या सहकाऱ्यावर नाहक टीका केल्यास पुढील पत्रकार परिषदेत उपरकर यांची अंडी पील्ली बाहेर काढू असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला.पालकमंत्री रवी चव्हाण यांच्यावर घाणेरडे आरोप करायचे आणि चार बातम्या छापून येतात हे पाहायचे कारण आपण सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये जिवंत आहे हे दाखवण्याचा केवलवाना प्रयत्न परशुराम उपरकर करत आहेत. राजकारणात त्यांची स्वतःची किंमत शून्य झालेल्या उपरकर यांना मनसेने पक्षातून हाकलून दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पायावर गेले त्यांनी घेतले नाही.शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनीही उपरकर याना पक्षप्रवेश दिला नाही.शिंदे साहेबांच्या पायावर नाक घासले तरी काही झाले नाही.उबाठा सेनेने पक्षात घेतले नाही.असे उपरकर याना किती किंमत द्यावी हे आम्हालाही कळते. त्यामुळे झिरो व्हॅल्यू झालेल्या उपरकर यांनी यापुढे भाजपा नेत्यांवर टीका करू नये असा सूचक इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button