
मांडवी एक्सप्रेस मधून महिला प्रवाशाची दागिन्याची पर्स खेचून चोरटा फरारी
कणकवली रेल्वे स्थानकावर मांडवी एक्स्प्रेसने मुंबईहून कणकवलीत येत असलेल्या सुनिता सुर्यकांत पाताडे (६०, रा. करंजे-आपटेवाडी) यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व १२ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ अज्ञात चोरट्याने गाडी रेल्वे स्थानकानजीक येत असताना संधीचा फायदा घेत हिसकावून घेतली. आणि धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून गेला. ही घटना रविवारी सायंकाळी ५.४५ वा.च्या सुमारास कणकवली रेल्वे पुलापासून अलिकडे बांधकरवाडी दरम्यान घडली संबंधित चोरटा हा त्यांच्यावर पाळत ठेवून होता. याप्रकारामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
www.konkantoday.com