कोकण किनारपट्टीवर परराज्यातील ट्रॉलर्सचा धुडगूस.
रत्नागिरी समुद्रातील वादळी वातावरण काहीसे शांत होतास कर्नाटक आणि गुजरातमधील हायस्पीड स्ट्रॉलर्सनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. अगदी रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या समुद्रात हे ट्रॉलर्स १२ सागरी मैलाच्या आत येवून बेकायदेशीरपणे माासेमारी करत असून मत्स्य विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याची तक्रार मच्छिमारांकडून केली जात आहे.मत्स्य हंगामाच्या सुरूवातीला समुद्र शांत होताच परराज्यातील मोठ्या हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न स्थानिक मच्छिमारांना दरवर्षीच भेडवसात असतो. परंतु स्थानिक मच्छिमारांच्या व्यवसायाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन आणि मत्स्य विभाग कोणत्याही ठोस उपाययोजना करताना दिसत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. www.konkantoday.com