मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-लोटे-चिपळूण येथे रस्त्यात मोकाट गुरे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-लोटे-चिपळूण येथे रस्त्यात मोकाट गुरे उभी अथवा बस्तान मांडून असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.महामार्गांवर मोठयाप्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असून त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळील शेतजमिनी विकल्या आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जमिनी विकण्याचा व्यावसाय जोमाने सुरु आहे. शेतजमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरे मोकाट सोडली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील शेतजमीन धनिकांना तसेच खाजगी कंपनीला विकल्याने संबंधित मालकांनी विकत घेतलेल्या शेती भोवती तारेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे शेती विकलेल्या शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी जागा राहिलेली नाही. शेतकऱ्यांनी सोडलेली मोकाट गुरे महामार्गांवर येत आहेत. परशुराम घाट आणि लोटे परिसरात रस्त्यावर गुरे अधिक असतात. लोटे परिसरात भातशेतीचे प्रमाणही कमी झाले असून शेतकरी गुरे चरण्यासाठी बाहेर सोडून देतात. ती रस्त्यावर येतात. ही गुरे वाहतुकीत अडथळा निर्माण करतात. कधी-कधी वाहतूक कोंडी होऊनअपघाताला कारण ठरत आहेत.