सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी कार्यकारी अभियंत्यांची पार्टनरशिप आहे- माजी आमदार परशुराम उपरकर.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यात फिरतात, पण कार्यकारी बांधकाम अभियंता अजयकुमार सर्वगोड मात्र फरार आहेत.जे सर्वगोड पुतळा उभारताना सातत्याने माध्यमांसमोर येवून बोलत होते, ते गेले कुठे? एवढी दूर्घटना घडूनही कार्यकारी अभियंता यांची कुठलीही चौकशी होत नाही. म्हणजेच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी कार्यकारी अभियंत्यांची पार्टनरशिप आहे, असा थेट आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.