बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यांनी बाळ आणि त्याच्यासह आई, आजी, आणखी एका चिमुकलीचा मृत्यू.
10 वर्षांपासून त्यांची मुलासाठी धडपड सुरू होती. मुलासाठी खूप प्रयत्न केले. नवसही केले. अखेर इतक्या वर्षांनी देवाने त्यांच्या पदरात मुलाचं सुख टाकलं. पण 6 महिन्यांचीच ते सुख पुन्हा हिरावून घेतलं.बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यांनी बाळ आणि त्याच्यासह आई, आजी, आणखी एका चिमुकलीचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरात घडलेली ही हृदयद्रावक घटना.अमरावती येथील अजय देसकर हे पुण्यामध्ये अभियंता पदावर काम करतात. ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर या गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यात आहेत. लग्न होऊन दहा वर्षे झाले तरीही बाळ होत नव्हतं. 6 महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याने आगमन केल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. या बाळांमुळे त्यांना असलेली चिंता आता दूर झाली होती.अजय आणि मृणाली यांच्या कुटुंबियांनी अमरावती येथे या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दोन दिवसांपूर्वी या गोंडस बाळालादोन दिवसांपूर्वी या गोंडस बाळाला अमोघ असं नाव त्यांनी दिलं.6 महिन्यांनी भयंकर घडलं मात्र काळाला हे जणू मान्यच नव्हतं.सोहळा झाल्यावर अतिशय उत्साही वातावरणात अजय यांनी पुण्याला बाळाची काळजी घेण्यासाठी मृणालची आई आशालता पोपळघट यांना देखील सोबत घेतले. अमरावती वरून सकाळी चिमुकल्यासह सहा जण पुण्याला जात होते. सायंकाळच्या सुमारास लिंबेजळगाव परिसरात रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव आलेल्या स्कार्पिओ कारने देसकर यांच्या कारला जोरदार धडक दिली.पुण्याला परत जात असताना अपघात झाला. धडक इतकी जोरात होती की त्यात मृणाली, दोन महिन्याचे बाळ अमोघ आणि मृणाल यांची आई आशालता पोपळघट यांचा दुर्दैवी झाला. तर गाडीत असलेल्या दुर्गा सागर गीते या 7 वर्षीय मुलीचा देखील मृत्यू झाला. तर अजय देसकर आणि शुभांगिनी सागर गीते हे गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.