चिपळुणात प्रवाशांचे दागिने लंपास.
गणेशोत्सवाकरिता गावी येण्यासाठी खासगी लक्झरी बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांचे तब्बल २ लाख ३७ हजार किंमतीचे दागिने चोरीस गेल्याची घटना तालुक्यातील खेरशेत येथे बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद सौरभ सुभाष चाळके यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ चाळके हे गौरी गणपती सणाकरिता ते आपल्या गावी येण्यासाठी १० सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी ते संगमेश्वर असा अमृत लक्झरी बसमधून प्रवास करत होते. असे असताना ते ११ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या पंचाअमृत हॉटेल, खेरशेत ठिकाणी आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. www.konkantoday.com