गुहागर पडवे नजीक म्हैशीवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू.
गुहागर तालुक्यातील काताळे येथील तरुणाचा रात्रीच्या वेळी म्हैशीवर दुचाकी आदळून मृत्यु झाला आहे. निखिल दिलीप कुळ्ये (वय 23) असे त्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या सोबत असलेला साहिल अजित कुळये यांच्या डोक्याला मार लागला असून डेरवण येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. शुक्रवारी (ता 13) रात्री 12 च्या सुमारास पडवे कातळावर दुचाकी म्हैशींवर आदळून हा अपघात झाला. निखिलच्या मृत्यूने काताळे गावावर शोककळा पसरली आहे.शुक्रवारी (ता 13) रात्री निखिल आणि साहील आपल्या मित्रांसह तीन दुचाकी घेवून भजनासाठी रोहीले गावात गेले होते. भजनाचा कार्यक्रम झाल्यावर निखिल आणि साहील दुचाकीवरुन काताळे गावी परत येत होते. पडवे फाट्यावरुन काताळेच्या दिशेने दुचाकी जात असताना पडवे हायस्कुलजवळ रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणारी म्हैस दुचाकी चालवणाऱ्या निखिलला नजरेत आली नाही. यामुळे निखिलची दुचाकी म्हैशींवर आदळली. दुचाकी धडकल्यावर निखिल आणि साहील दोघेही रस्त्यावर आदळले. निखिल जागीच बेशुद्ध पडला. पाठीमागुन येणाऱ्या निखिल, साहील सोबतच्या मित्रांनी हा अपघात पाहीला. त्यांनी तातडीने काताळे गावात संपर्क केला. निखिल व साहीलचे मित्र त्यांना तत्काळ आबलोली प्राथमिक उपकेंद्रात घेऊन गेले. तेथून त्यांना डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डेरवण येथे पोहचेपर्यंत निखिलचा मृत्यू झाला