
जिल्हा परिषद शाळेच छत कोसळून मोठे नुकसान
कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्यातच चिपळूण तालुक्यातील गोडे- लिंगाडे वाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळल्याची घटना गुरुवारी घडली.सुदैवाने विद्यार्थी असलेल्या खोलीमध्ये काही नुकसान झाले नाही त्याच्यामुळे मोठा अनर्थ टळला.या घटनेमुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.१०० हून अधिक काैले,४० कोने व २५ हुन अधिक वासे कोसळून नुकसान झाले.
www.konkantoday.com