
अतिवृष्टीमुळे ऐतिहासिक वाळू टेकडी नष्ट होण्याच्या मार्गावर
रत्नागिरी ः केळशीजवळ पुणे येथील पुरातत्व विभागाचे संशोधक अशोक मराठे यांनी उजेडात आणलेल्या केळशी येथील वाळूची टेकडी अतिवृष्टीमुळे व खाडीला येणार्या लाटांच्या तडाख्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पुणे येथील डेक्कन कॉलेजचे पुरातत्व विभागाचे संशोधक अशोक मराठे यांनी या टेकडीचा शोध लावल्यानंतर त्याचे महत्व वाढले होते. ही टेकडी पाहण्यासाठी देशातून व राज्यातून अनेक अभ्यासक व पर्यटक येत होते. सागरी महामार्गावर बांधण्यात येणार्या पुलामुळे ही टेकडी नष्ट होणार होती. त्याला सर्वांनी विरोध केला होता. त्यामुळे या टेकडीचे अस्तित्व राहिले होते. या टेकडीच्या बाजूला संरक्षण बंधारा बांधावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सध्या होणार्या अतिवृष्टीमुळे व उधाणाच्या भरतीच्या लाटांमुळे ही टेकडी ढासळत चालली असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
www.konkantoday.com