रत्नागिरी जिल्हा निवड स्पर्धेत सौरिश कशेळकर अजिंक्य १९ वर्षाखालील गट : साहस नारकर उपविजेता तर ओंकार सावर्डेकर तृतीय

🔹 रत्नागिरी चेस अकॅडमी आयोजित १९ वर्षाखालील कै. अनिल कानविंदे स्मृती जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीच्या सौरीश कशेळकर याने साडेसहा गुणांसह अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. चिपळूणच्या साहस नारकर याने सहा गुणांसह उपविजेतेपद तर ओंकार सावर्डेकर याने साडेपाच गुणांसह तृतीय क्रमांक आणि रत्नागिरीच्या आयुष रायकर याने चौथा क्रमांक पटकावला.सदर स्पर्धा रत्नागिरी चेस अकॅडमी मार्फत रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरे नाका रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या संचालक सदस्या सौ. प्रतिभा प्रभुदेसाई व ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर शरद प्रभूदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मुलींच्या गटात गुहागरच्या पद्मश्री वैद्य हिने विजेतेपदाला गवसणी घालत राज्य निवड स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. राजापूरच्या मृणाल कुंभार हिने उपविजेतेपद तर रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाई व निधी मुळ्ये यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. वर नमूद केल्याप्रमाणे मुलांच्या व मुलींच्या गटातून प्रत्येकी चार खेळाडूंची निवड कोल्हापूर येथे झालेल्या राज्य निवड स्पर्धेसाठी केली गेली.🔸 *स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिके खालील प्रमाणे :*🔹 *नऊ वर्षाखालील मुले*पारस मुंडेकर, विहंग सावंत 🔸 *बारा वर्षाखालील मुले*रूमिन वस्ता, राघव पाध्ये 🔹 *पंधरा वर्षाखालील मुले*आर्यन धुळप, मिहीर काणेकर🔸 *बारा वर्षाखालील मुली*आर्या पळसुलेदेसाई, रमा कानविंदे 🔹 *पंधरा वर्षाखालील मुली*स्वरा कांबळे, सानवी दामलेया स्पर्धेत विवेक सोहनी यांनी मुख्य पंच म्हणून काम केले. ही स्पर्धा कै. अनिल कानविंदे यांच्या कुटुंबीयांनी प्रायोजित केली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चैतन्य भिडे, अवधूत पटवर्धन तसेच कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button