रत्नागिरीतील विविध विकासकामांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा.
रत्नागिरी,- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केद्र, ध्यान केंद्र, प्राणी संग्रहालय, शिवसृष्टी, थ्रीडी मल्टीमीडिया, राजिवडा बंदर सुशोभिकरण व इतर जिल्हा नियोजन विकास कामांचा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी राहूल देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत यांनी सविस्तर आढावा घेऊन ते म्हणाले, सर्व विकासकामे गतीने पूर्ण करावीत. 1, 2, 3 ऑक्टोबर रोजी यातील कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याचे नियोजित आहे, त्यादृष्टीने संबंधित विभागाप्रमुखांनी कामे मार्गी लावावीत. राजिवडा येथील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनच्यामार्फत कार्यवाही पूर्ण करावी. हा गाळ दोन टप्प्यांमध्ये काढण्यात यावा. 2 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक कॅशलेस हॉस्पीटल आणि थ्रिडी मल्टीमीडिया शो चे उद्घाटनबाबत नियोजन करावे. सर्व कामे युध्दपातळीवर सुरु करावी, असेही ते म्हणाले.000