प्रभादेवी परिसरात सिग्नलवरच असलेला व्हीआयपी रस्ता खचला ,चारचाकी अडकली.
प्रभादेवी जंक्शन परिसरात रस्ता खचला खचल्याची घटना समोर आलीय. खचलेल्या रस्त्याची १५ ते २० फूट खोली असल्याचं सांगितलं जातंय. खचलेल्या रस्त्यात एक चारचाकी अडकली होती.मुंबईतील प्रभादेवी परिसरात सिग्नलवरच असलेला व्हीआयपी रस्ता खचला आहे. या रस्त्यावर गाडी अडकली होती. आता मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता खचण्याचं कारण शोधताना दिसून येत आहेत. भरधाव वेगातील कार अचानकपणे रस्त्यात खाली गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता. व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्त्यात गाडी अडकलेली आहे. रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला दिसत आहे.रस्ता खचल्याचीही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. पाण्याच्या लाईन देखील लिकेज आहेत,काम का करत नाही? असा सवाल मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलाय. काम करायची सरकारची इच्छा शक्ती नाही, असं धुरी यांनी म्हटलंय. इथे अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे. पावसाळा असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.