
पोलादपूर तालुक्यात गांजा विक्री करणार्यांचे धाबे दणाणले,कशेडी घाटात साडेचोवीस किलो गांजासह ब्रिझा कार जप्त.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढर्या रंगाच्य मारूती ब्रिजा कारमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरूणास पोलिसांनी अटक केली असून ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे साडेचोवीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलादपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही धडक कारवाई केली.या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा साडे अकरा वाजता गुन्ह्याची नोंद पोलादूप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या छाप्यामुळे पोलादपूर तालुक्यात गांजा विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. www.konkantoday.com