
डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून मत्स्यव्यवसाय विभागास तात्काळ वितरीत करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले
महाराष्ट्रात २०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी ६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यातील फक्त १९ कोटी ३५ लाख रूपयांचाच परतावा मत्स्यव्यवसाय विभागाला वितरीत करण्यात आलेला आहे. उर्वरित ४० कोटी ६५ लाखांचा परतावा लवकरात लवकर वित्त विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागास वितरीत करण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या मागणीला अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून मत्स्यव्यवसाय विभागास तात्काळ वितरीत करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी राज्याच्या वित्त सचिवांना दिले असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.
www.konkantoday.com