मरीन ड्राइव्हवरून आता थेट वांद्र्याला पोहोचा 12 मिनिटांत, कसा आहे नवा रोड? आज उदघाटन!
कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचे आज गुरूवारी उदघाटन होत आहे. या रोडचे उदघाटनामुळे मरिन ड्राईव्ह वरून अवघ्या 12 मिनिटांत वांद्र्याला पोहोचता येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून उपनगरात जाण्यासाठीचा प्रवास हा सुसाट होणार आहे. कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग आजपासून वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे उपनगरात राहाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळ ही वाचणार आहे.बिंदू माधव चौकातून हा मार्ग वाहतूकीसाठी खुला केला जाईल. या मार्गामुळे मरिन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटात पूर्ण करता येणार आहे. या मार्गामुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळीची मोठी बचत होणार आहे. त्यातून जवळपास 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधन बचत होणार आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्ग सुरू झाला आहे. आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडला आहे.हा रोड मुंबईकरांना दिलासा देणारा ठरणार आहे. दक्षिण मुंबईतून थेट उपनगरात प्रवेश करता येणार आहे. शिवाय हा प्रवासही सुसाट होईल. कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडला गेला आहे. त्यामुळे मरिन ड्राईव्हवरून निघाल्यानंतर काही मिनिटात वांद्रे गाठणे शक्य होणार आहे. सर्वात म्हणजे या प्रवासासाठी पहीले मोठी वाहतूक कोंडी होत होती. आता ही वाहतूक कोंडी होणार नाही. विशेष म्हणजे सिग्नल मुक्त असा हा प्रवास असेल.या प्रकल्पातील मुख्य टप्पा महाकाय गर्डर होता. या मार्गावरील 136 मिटरचा पट्टा हा याच गर्डरने जोडला गेला आहे. हा आर्च स्वरूपाचा गर्डर असून तब्बल दोन हजार मेट्रिक टन वजनाचा आहे. हा आता कोस्टल रोड आणि वरळी सिलिंकला जोडेल. हा मार्ग आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या उपनगरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे हे निश्चित.