मंत्री रामदास आठवले २० रोजी रत्नागिरी दौर्‍यावर.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वा. रत्नागिरी येथील विवेक हॉटेल सभागृहामध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रिपाई कार्यकर्ते मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी रामदास आठवले यांचा जाहीर भव्य सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रितम रूके यांची निवड करण्यात आली आहे. तर सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे हे करणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून रत्नागिरी तालुकाध्यक्ष विलास कांबळे हे करणार आहेत. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष, सिद्धार्थ कासारे, प्रदेश सरचिटणीस, गौतम सोनावणे, कोकण प्रदेश अध्यक्ष, प्रकाश मोरे उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button