यापुढे विनापरवाना वृक्षतोड केल्यास ५० हजारांचा दंड
विनापरवानगी वृक्षतोडीला पूर्णविराम मिळण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत विनापरवाना वृक्षतोड केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा अध्यादेश न मिळाल्याने वेगवेगळ्या शंका उपस्थित होत होत्या. अखेर २ दिवसांपूर्वी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या स्वाक्षरीनंतर निघालेल्या या अध्यादेशाची प्रत राज्य वनविभागाच्या कार्यालयाना प्राप्त झाली आहे. आता सर्वत्र या नव्या निर्णयानुसार दंडाची आकारणी केली जाणार आहे. www.konkantoday.com