
कोंडिवरेत आगीत ४ एकरातील केळी लागवडीचे १५ लाख रुपयांचे नुकसान
संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे गावी लागलेल्या वणव्यात केळी, साबुदाणा, ऊस आदी चार एकरातील लागवड भस्मसात होवून सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळा सुरू होताच माखजन, कोंडिवरे भागात वणवे लागण्यास सुरूवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे केळीची बाग येथे गडनदीशेजारी केरळ राज्यातील निलंबत रवी या शेतकर्याने सुमारे ४ एकर जमीन क्षेत्रात केळी, साबुदाणा, ऊस, बोंड, फणस, अननस आदींची शेती केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षापासून कोंडिवरे येथे ते विविध पिक घेत आहेत. मंगळवारी सकाळी कोंडिवरे गडनदी भागात आग लागली. या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. आगीने शेतीला विळखा घातला. या लागलेल्या वणव्यात साबुदाणा, ऊस, केळी आदी लागवड क्षणात भस्मसात झाली. यामुळे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. www.konkantoday.com