
चिपळूण रेल्वे स्थानकात पार्किंगमध्ये ठेकेदारांकडून अतिरिक्त शुल्काची आकारणी
चिपळूण येथे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी असलेले हक्काचे पार्किंग अचानक गायब झालं असून पे ऍण्ड पार्क ठेकेदाराकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक कार्यकर्ते सिद्धेश लाड यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
चिपळूण रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना स्वतंत्र पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रोज प्रवास करणारे नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले असून नाराजीचे वातावरण आहे. सिद्धेश लाड यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मुलभूत सोईंकडे दुर्लक्ष करून खाजगी ठेकेदारांना मोकळं मैदान दिलं आहे. प्रवाशांच्या हक्काचं पार्किंग गायब करून त्यांची फसवणूक केली जात आहे.
www.konkantoday.com




