
भाजपचे राजकारण पाहून आता जरा भीती वाटू लागली आहे, -आ. भास्कर जाधव
माझ्या वाट्याला अनेक अडचणी सातत्याने येत आहेत. खोटेनाटे आरोप केले जात आहेत. आणि मोठ्या प्रमाणात विरोधक तयार झाले आहेत. पण मी माझे तत्व कधीही सोडले नाही. स्पष्टवक्तेपणा सोडला नाही. खोटं बोलायचं नाही आणि खोटं कधीही सहन करायचं नाही. दिलेला शब्द पाळायचं, यातून मी राजकारणात यशस्वी झालो. सध्या सातत्याने माझ्या वाट्याला अनेक अडचणी येत आहेत. पूर्वी कसलीही भीती वाटत नव्हती. मात्र २०१४ नंतरचे भाजपचे राजकारण पाहून आता जरा भीती वाटू लागली आहे, अशी चिंता आमदार भास्कर जाधव यांनी बोलून दाखविली. गणेशोत्सवासाठी आ. जाधव आपल्या गावी तुरंबव येथे आले असता बोलत होते. www.konkantoday.com