
तीन वर्षे अतिरिक्त कार्यभारामध्ये सुरू असलेला गुहागर नगरपंचायत मुख्याधिकार्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ अखेर थांबला
गेली तीन वर्षे अतिरिक्त कार्यभारामध्ये सुरू असलेला गुहागर नगरपंचायत मुख्याधिकार्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ अखेर थांबला आहे. गुहागर नगरपंचायतीसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून पोलादपूरचे स्वप्नील चव्हाण यांनी नियुक्ती झाली आहे.पोलादपूरचे रहिवासी असलेल्या स्वप्नील चव्हाण यांनी अलिबाग नगरपरिषदेत परिवेक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून सहा महिने अनुभव घेतला. यानंतर गुहागर नगरपंचायतीत त्यांना मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली.www.konkantoday.com