लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शिल्लक जागेवर समुपदेशन पद्धतीने प्रवेश. रत्नागिरी, दि. 10 (जिमाका) : येथील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. टेक. व थेट द्वितीय वर्ष बी. टेक. च्या विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्ष (सी ई टी सेल) यांच्यामार्फत पार पडलेल्या केंद्रीय प्रवेश फेरीनंतर शिल्लक (ए सी ए पी) राहिलेल्या जागेवर प्रवेशासाठी समुपदेशन पद्धतीने (आॕन द स्पाॕट अॕडमिशन बाय कौन्सेलिंग) ने 12 व 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नाव नोंदणी करून, आवश्यक ते मूळ प्रमाणपत्र व प्रवेश फी सहित वरील दिनांकास स्वतः महाविद्यालयात उपस्थित रहावे, असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून कळविण्यात आले आहे.
* प्रवेशाबाबत अधिकची माहिती जसे की उपलब्ध जागा, प्रवेश फी इत्यादी माहितीसाठी संस्थेच्या संकेत स्थळास (https://www.gcoer.ac.in) भेट द्यावी. तसेच https:www.gcoer.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. टेक. व थेट द्वितीय वर्ष बी. टेक. साठी अर्टिफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी, सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर तंत्रज्ञान या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्यामार्फत पार पडलेल्या केंद्रीय प्रवेश फेरीनंतर शिल्लक (एसीएपी) राहिलेल्या जागेवर प्रवेशासाठी समुपदेशन पद्धतीने होणार आहे. बी.टेक (सर्व शाखा) प्रथम वर्षासाठी 12 सप्टेंबर तर थेट द्वीतीय वर्ष बी.टेक सर्व शाखांसाठी 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. 000