भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत प्रभाग क्र. ६ घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
रत्नागिरी : रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ या भागामध्ये निलेश आखाडे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक गणेश भक्तांनी सहभाग नोंदविला असून. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अजूनही दोन दिवस शिल्लक आहेत. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर, खासदार नारायणराव राणे साहेब, माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ मध्ये निलेश आखाडे प्रस्तुत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अजूनही यामध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल तर दोन दिवसात आपल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ दिलेल्या व्हाट्सअप (९८६०६२५७४०) क्रमांकावर ती पाठवायचे आहेत. अजूनही कोणाला सहभागी व्हायचे असल्यास आपले सजावटीचे फोटो व्हिडिओ पाठवा असे आवाहन निलेशजी आखाडे यांनी केले आहे.