घरातील सिलेंडर लिकेज होऊन झालेल्या दोन स्फोटात घरातील कुटुंब बालंबाल बचावले.

राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ येथे घरातील सिलेंडर लिकेज होऊन झालेल्या दोन स्फोटात घरातील कुटुंब बालंबाल बचावले आहे.सविस्तर वृत्त असे की, गुरुकृपा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणारे डॉ. चौगुले यांच्या घरी रविवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने छोटे मोठे दोन स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात असलेल्या दोन मुलांसह पती, पत्नी बाहेर पडल्याने सुदैवाने नुकसान टळले.डॉ. क्रांतिकुमार चौगुले गेल्या दीड वर्षांपासून पाचल बाजारपेठेतील गुरुकृपा अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावर राहतात, तालुक्यातील रायपाटण धामणपे गावी स्वतःचा दवाखाना असलेले डॉ. नेहमी प्रमाणे रात्री सव्वाआठच्या दरम्यान पाचल येथील त्यांच्या राहत्या घरी आले. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होताना कसला तरी मोठा आवाज झाल्याने बाथरूम मधून बाहेर येऊन पाहता गॅस सिलेंडरची टाकी किचन कट्ट्याखाली पडून त्यातून गॅस लिकेज होतं असल्याचे निदर्शनास आले, काही क्षणातच गॅस घरभर पसरू लागल्याने दोन लहान मुलं आणि पत्नीला घेऊन इमारती खाली आले व सदर घटनेबाबत आजूबाजूला व पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button