
ऐन सणाला रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच सीएनजी पंपावर गॅसचा तुटवडा.
ऐन सणाला रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच सीएनजी पंपावर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अगोदरच गणेशोत्सवासाठी दाखल होत असलेल्या चाकरमान्यांना महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत असतानाच आता गॅसचा पण फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक रिक्षाव्यावसायिक हैराण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे हात वर केले आहे. जिल्ह्यात डझनभर सीएनजी पंप असले, तरी तुटवडा काही कमी झाल्याचे दिसत नाही. नेहमीच्या दिवसात काही पंपात तुटवडा जाणवत असतो. याची झळ रिक्षा चालकांसह अनेक वाहनधारकांना पोहोचते. रिक्षा व्यावसायिकांना आता चाकरमानी गावात आल्याने चांगली भाडी मिळतात. मात्र सीएनजी नसल्याने अनेक रिक्षा चालकांना घरीच बसावे लागत आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. www.konkantoday.com