उत्तर प्रदेशमधील कानपूरनंतर आता राजस्थानमध्येही रुळांवर अवजड वस्तू ठेवून रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न.
उत्तर प्रदेशमधील कानपूरनंतर आता राजस्थानमध्येही रुळांवर अवजड वस्तू ठेवून रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे ७० किलो वजनाचा सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यात आल्याचं समोर आलं.या माध्यमातून एखा मालगाडीला अपघात घडवण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत रुळांवर सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोमवारी कानपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर ठेवण्यात आला होता. त्याला कालिंदी एक्स्प्रेसची धडक बसली होती. मिळालेल्या माहितीनुसार अजमेरमधील सराधना आणि बांगड ग्राम रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन ठिकाणी सिमेंटचे सुमारे १०० किलो वजनाचे ब्लॉक ठेवण्यात आले होते. दोन्ही ठिकाणांमध्ये सुमारे एक किलोमीटरचं अंतर होतं. या प्रकरणी डीएफसीसी कर्मचारी रवी बुंदेला आणि विश्वजित दास यांनी एआयआर दाखल केली आहे.