
खेड तालुक्यातील पीरलोटे येथे एकाची १ लाख ५४ हजार १११ रुपयांची ऑनलाईन फसवणूक.
पोलिसांकडून व संबंधित यंत्रणेकडून वारंवार जागृती करूनही रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत खेड तालुक्यातील पीरलोटे येथे एकाची १ लाख ५४ हजार १११ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार अज्ञातावर शनिवारी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत यल्लोजीराव सोंगाडी (६०, रा. पीरलोटे) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. तुमचे क्रेडिट कार्ड आंतरराष्ट्रीय झाले असून त्यासाठी तुम्हांला दरमहा ६,५०० रूपये भरावे लागतील, असे खोटे सांगून त्यांच्यावर मुलाच्या अकाऊंटमधील रक्कम कपात झाले. अनोळखी व्यक्तीने १ लाख ५४ हजर १११ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आपले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे