पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत दीड दिवसांच्या गणरायाला रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. पण पुढच्या वर्षी खरोखरच बाप्पा लवकर येणार आहेत.२०२५ साली बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत. पुढील वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. वाजत गाजत शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. यावषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे. गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील एकरा वर्षातील श्रीगणेश चतुर्थीचे दिवस१) बुधवार २७ ऑगस्ट २०२५२) सोमवार १४ सप्टेंबर २०२६३) शनिवार ४ सप्टेंबर २०२७४) बुधवार २३ ऑगस्ट २०२८५) मंगळवार 11 सप्टेंबर 2029६) रविवार १ सप्टेंबर २०३०७) शनिवार २० सप्टेंबर २०३१८) बुधवार ८ सप्टेंबर २०३२९) रविवार २८ ऑगस्ट २०३३१०) शनिवार १६ सप्टेंबर २०३४११) बुधवार ५ सप्टेंबर २०३५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button