
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर अंतराळात आणखी आठ महिने अडकले.
नासाचे स्टारलाइनर या अंतराळयानाचे शनिवारी न्यू मेक्सिकोच्या व्हाईट सँड्स मिसाईल रेंजवर लँडिंग झाले. पण नासाचे हे यान भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्म आणि बूच विल्मोर यांच्याशिवाय पृथ्वीवर परतले.यामुळे हे दोन्ही अंतराळवीर पुढील वर्षापर्यंत अंतराळ स्थानकावरच राहतील.ऑटोपायलट मोडवर चालणारे स्टारलाइनर कॅप्सूल हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर सहा तासांनी वाळवंटात उतरले. ते चीनपासून २६० मैल (४२० किलोमीटर) वर अंतराळ यानापासून वेगळे झाले आणि स्प्रिंग्सच्या मदतीने ते परिक्रमा प्रयोगशाळेपासून दूर ढकलले गेले.अंतराळ स्थानकाच्या कॅमेऱ्यांत आणि नंतर नासाच्या विमानाने उतरणाऱ्या स्टारलाइनरला पांढऱ्या रेषाच्या रूपात कॅमेऱ्यात कैद केले. “ती घरी जात आहे,” असा संदेश अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी स्टारलाइनरने परतीच्या प्रवास सुरु केल्यानंतर रेडिओवर दिला होता.सुनीता फेब्रुवारीच्या अखेरीस पृथ्वीवर परतणारसुनीता आणि विल्मोर यांना ५ जून रोजी एकाच अंतराळ यानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवले होते. स्टारलायनर कॅप्सूलचे हे पहिले वहिले उड्डाण होते. हे यान १३ जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. पण थ्रस्टर निकामी झाल्याने आणि हेलियम गळतीमुळे त्यांचा अंतराळ स्थानकावरील मुक्काम वाढला होता. त्यानंतर NASA ने निर्णय घेतला की स्टारलाइनरमधून दोघा अंतराळवीरांना परत आणणे खूप धोकादायक आहे. आता स्पेसएक्स फेब्रुवारीच्या अखेरीस दोघांनाही पृथ्वीवर परत आणेल. यामुळे त्यांची केवळ आठ दिवसांची मोहीम आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत लांबली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत.www.konkantoday.com