सिलेंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा मृत्यू.
संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलेंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. बाळू सोमा बांबाडे (५५, गोमाने वाडी, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. या घटनेने ऐन गणेशोत्सवात बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सविसर वृत्त असे की, शेंबवणे गोमानेवाडी येथील बाळू बांबाडे हे सकाळी ८.३० वाजता घरात गणेश मूर्तीची पूजा अर्चा करत होते. यावेळी त्यांच्या पत्नीने सारवण करताना त्यांना हाक मारली. गॅस बाजूला करण्यास सांगितले. यावेळी गॅस लिकेज झाला. त्यावेळी सिलेंडरचा भडका उडून गंभीर जखमी झाले. त्यात ते ९० टक्के भाजले. घटनेची माहिती आजूबाजूला कळताच त्यांना ग्रामस्थांनी लगेच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची स्थिती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू त्यांचा मृत्यू झाला