
भाजपा मध्ये कोणीही नाराज नाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला दावा.
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा नुकताच ३१ ऑक्टोंबर रोजी रत्नागिरी दौरा संपन्न झाला. पदवीधर निवडणुकीसाठी आढावा रवींद्र चव्हाण यांनी घेतला. कोकणातील पदवीधर मतदार संघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. आणि या वेळेस देखील जो उमेदवार असेल तो चांगल्या मताने निवडून येईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले व कशा पद्धतीने काम केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. पदवीधर मतदार संघाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी,एकत्रित काम करून निवडून आणेल.
www.konkantoday.com