चिपळूण शहर हादरले; बहादूर शेख नाका येथे खूनाचा प्रकार.
संपूर्ण कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना चिपळूण शहरात खुनाचा प्रकार घडला आहे चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसरात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. एकूण परिस्थिती वरूनया तरुणाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून चिपळूणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या तरुणाची ओळख पटली असून हमीद शेख असे या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा संपूर्ण प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे.