
चिपळूणात चक्क बस हरवली
. चाकरमान्यांना घेऊन मोठ्या प्रमाणावर एसटीच्या बसेस कोकणात दाखल झाले आहेतचिपळूण एसटी स्टँड परिसरात जवळपास १०० बस उभ्या राहिल्या होत्या कोल्हापूर चिपळूण ही बस चिपळूण बस स्थानकातील शिवाजीनगर या बस स्थानकात पार्किंग साठी उभी केली होती. मात्र सकाळी ज्यावेळी वाहक ही बस चिपळूण कोल्हापूर या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आला असता त्याला त्याच्या जागेवर ही बस दिसली नाही. आणि पुढे ही बस त्या जागेवर दिसत नसल्याने चोरीला गेली याची चर्चा सुरू झाली त्यातच आगारातील कर्मचार्यांनी सीसीटीव्हीचा फुटेज चेक केला असता ही बस या डेपोतून बाहेर पडल्याचे दिसून आले.त्यानंतर दिवसभर या बसची चर्चा आणि शोधाशोध सुरू होती अखेर कोल्हापूर आगाराची ही बस गुहागर येथील आगारात असल्याचं एसटीच्या कर्मचार्यांना समजलं आणि त्यानंतर मात्र बसचे शोध कार्य थांबले मात्र ही बस नेमके तिकडे कशी गेली याबाबत आता चौकशी सुरू आहे