गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवण्याची गेल्या 28 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा खंडीत.

रेल्वे प्रशासनाच्या एका निर्णयामुळे गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गेल्या 28 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा खंडीत झाली आहे.रेल्वे प्रशासनाने विरोध केल्यानंतर यावेळी गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवण्यात आले नाही.गेल्या 28 वर्षांपासून गोदावरी एक्स्प्रेसमधील पासधारकांच्या बोगीमध्ये गणपती बसवण्यात येत होते मात्र यंदा रेल्वे प्रशासनाने केलेल्या विरोधामुळे यंदा गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवण्यात आले नाही. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात मनमाड रेल्वे स्थानकावर निषेध देखील करण्यात आला.रेल्वे प्रवासी संघटनेकडून स्थापना मनमाड– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गणेशोत्सवात नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतील एका डब्ब्यात गणपती बसवण्याची परंपरा सुरु केली होती. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये दरवर्षी रेल्वे प्रवासी संघटना आणि गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात होती मात्र यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button